Home ठळक बातम्या कल्याण स्टेशन परिसरात ‘नो पार्कींग’मध्ये उभ्या पोलीस वाहनांवर ट्रॅफिक पोलीसांची अखेर कारवाई

कल्याण स्टेशन परिसरात ‘नो पार्कींग’मध्ये उभ्या पोलीस वाहनांवर ट्रॅफिक पोलीसांची अखेर कारवाई

कल्याण दि.25 ऑक्टोबर:
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु असून ‘नो पार्किंग’चा बोर्ड लावूनही याठिकाणी गाड्या उभ्या केल्या जातात. विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांच्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. याविरोधात कल्याण शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला पाहायला मिळाला. कल्याण ट्रॅफिक पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो पार्किंग’ क्षेत्रात असणाऱ्या सुमारे 100 हून अधिक गाड्यांवर कारवाई केली.

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास प्रकल्पाचे काम सुरु असून परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच रिक्षाचालक आणि नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या केलेल्या दुचाकींमुळे या वाहतूक कोंडीच्या त्रासात आणखीनच भर पडते. विशेष म्हणजे नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांपैकी बहुतांश गाड्या या पोलीस आणि वकिलांच्या असल्याची माहिती सुखदेव पाटील यांनी दिली.

‘नो पार्कींग’मध्ये उभ्या या गाड्यांसंदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्यांविरोधात कारवाई केली. यामध्ये 100 हून अधिक पोलिसांच्या गाड्यांना ई चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात आला. तसेच याठिकाणी पुन्हा गाड्या उभ्या न करण्याचे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा