Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव

डोंबिवली दि.12जून :

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीतील भीषण आगीला काही दिवस होत नाहीत तोच आज सकाळी पुन्हा एकदा याठिकाणी असलेल्या केमिकल कंपनीत अग्नितांडव झालेले पाहायला मिळाले. येथील आणखी एका मोठ्या केमिकल कंपनीत आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये असणाऱ्या इंडो अमाईन नावाच्या कंपनीत आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे दिसून आले. या आगीची भीषणता इतकी होती की त्यातून उठणारे धुराचे लोट हे दूरपर्यंत दिसून येत होते. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

तर ही आग नेमकी कशामुळे लागली आहे आणि त्यात कोणाला दुखापत झाली आहे का याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र एक महिन्याच्या अंतराने लागोपाठ लागलेल्या या आगीच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा