Home ठळक बातम्या कल्याणात उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग ; परिसरात धुराचे साम्राज्य

कल्याणात उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग ; परिसरात धुराचे साम्राज्य

 

कल्याण दि.१ जून :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून आगीमुळे संबंधित परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. (Fire at Umberde waste project in Kalyan; Empire of smoke in the area)

कल्याणात यापूर्वी जुन्या म्हणजेच वाडेघर येथील डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याला मधल्या काळात वारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्या. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी बारावे येथील घनकचरा प्रकल्पही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असताना आज उंबर्डे येथील प्रकल्पातही दुपारी तीनच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. उंबर्डे येथील प्रकल्पात ओला आणि सुका कचऱ्याचे विघटन केले जाते. याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाने त्वरीत घटनास्थळी धाव घेत २ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीमुळे संबंधित परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. तसेच बारावे पाठोपाठ उंबर्डे येथे लागलेल्या या आगीच्या घटनेने संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा