Home ठळक बातम्या डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करा, अन्यथा खळखट्याक ; मनसेचा इशारा

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करा, अन्यथा खळखट्याक ; मनसेचा इशारा

 

डोंबिवली दि. 9 एप्रिल :
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर डोंबिवलीत मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत असून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंबिवली मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी काल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. (Free the Dombivli station area from peddlers, otherwise ; MNS warning)

डोंबिवली स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यानी अतिक्रमण केलं असून नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात खुले आमपणे फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असल्याचे दिसते. स्टेशन परिसरापासून १५० मिटीरपर्यंतचा परिसर फेरीवाल्यांपासून मोकळा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असेल तरी त्याचे डोंबिवलीत पालन होत नसल्याचे मनोज घरत यांनी सांगितले. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून होणारी कारवाई केवळ दिखावा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. गेली 25 वर्षे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची सत्ता असून त्यांना अद्याप फेरीवाल्यांचे नियोजन करता आलेले नसल्याचे सांगत फेरीवाल्यांकडून हप्ते खाण्यासाठी आपण आहात का असा संतप्त सवालही घरत यांनी यावेळी केला. डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा नाहीतर मनसे आपल्या स्टाईलने मैदानात उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष्य मनोज घरत यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. केडीएमसी प्रशासन आता यावर काय कार्यवाही करते हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा