Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेच्या काही भागांचा वीजपुरवठा उद्या 8 तास बंद – महावितरणची माहिती

कल्याण पश्चिमेच्या काही भागांचा वीजपुरवठा उद्या 8 तास बंद – महावितरणची माहिती

वीज वाहिनीवर होणार देखभाल दुरुस्तीचे काम

कल्याण दि.7 एप्रिल :
मुख्य वीज वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील काही भागांचा वीज पुरवठा उद्या शुक्रवारी (8 एप्रिल 2022) 8 तास बंद राहणार आहे. कल्याण पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. (0Power supply to some parts of Kalyan West will be cut off for 8 hours tomorrow – MSEDCL information)

कल्याण पश्चिम विभागातील मोहने उच्चदाब उपकेंद्रातील मोहने 7, मोहने 12 आणि बारावे उपकेंद्रातील बिर्ला कॉलेज रोड वीज वाहिनीवर उद्या शुक्रवारी देखभाल दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजल्याासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत या वीज वाहिनीवरील ग्राहकांचा वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

या भागांचा वीज पुरवठा राहणार बंद…

मोहने 7 मध्ये – अटाळी, वडवली, आंबिवली आणि मांडा…

मोहने 12 मध्ये – मोहने गाव, गाळेगाव, जेतवन नगर, फुले नगर यादव नगर, सहकार नगर, बाजारपेठ, आर.एस. टेकडी, एनआरसी कॉलनी, धम्मदिप नगर

बारावे, कॉलेज रोडमध्ये – बिर्ला कॉलेज रोड, संदीप हॉटेल परिसर, भोईरवाडी, आर टी ओ, मिलिंद नगर, केडीएमसी बी वॉर्ड ऑफिस परिसर, कोकणरत्न हॉटेल परिसर आणि गगनगिरी सोसायटी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा