Home ठळक बातम्या आमदारांना घरं देण्याऐवजी सर्वसामान्यांना मोफत वीज द्या – मनसे आमदार राजू पाटील

आमदारांना घरं देण्याऐवजी सर्वसामान्यांना मोफत वीज द्या – मनसे आमदार राजू पाटील

 

आमदार राजू पाटील यांनी नाकारले सरकारी घर

डोंबिवली दि.26 मार्च :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांना 300 घरं देण्याचे जाहीर केले. मात्र आमदारांना सरकारी घरं कशासाठी त्याऐवजी सर्वसामान्यांना मोफत वीज द्या अशी मागणी करत मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारी घर घेण्यास नकार दिला. मनसे आमदार राजू पाटील यांनी या घेतलेल्या निर्णयाचे समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत होत असून राज्य सरकारवर मात्र टिका होत असल्याचे दिसत आहे. (Give free electricity to common people instead of giving houses to MLAs – MNS MLA Raju Patil)

त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनीट मोफत वीज द्या..

महाविकास आघाडी सरकार फक्त बोलणारे सरकार नसून करून दाखवणारे सरकार असल्याचे सांगत सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत 300 घरं देणार असल्याची घोषणा त्यांनी विधानसभा अधिवेशनात केली. मात्र हो घोषणा करून काही तासही उलटत नाहीत तोच मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट करत आपल्याला हे सरकारी घर नसल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच आमदारांना मोफत घरं कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनीट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशिर्वाद मिळवा असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

85 ते 90 टक्के आमदार हे कोट्याधीश

राज्य सरकारने अशी घोषणा करण्यापूर्वी आपली प्राथमिकता पाहणे आवश्यक आहे. एकीकडे कोरोनामुळे तिजोरी रिकामी झाली आहे असे सांगायचे आणि दुसरीकडे अशी खैरात वाटत सुटायचे अशा शब्दांत आमदार राजू पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तसेच 85 ते 90 टक्के आमदार हे कोट्याधीश असून हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आमदार असे असतील की ज्यांना घराची गरज आहे. असे 2 ते 3 आमदार असू शकतील त्यांना तर मोफत घरं द्या बाकी इतरांना देण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे मतही आमदार पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सामान्य जनता तसेच सोशल मीडियावर जोरदार स्वागत होताना दिसत आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा