Home ठळक बातम्या गुडन्युज : कल्याणात 28 आणि 29 जानेवारी रोजी भरणार जागतिक दर्जाचे ‘सायन्स...

गुडन्युज : कल्याणात 28 आणि 29 जानेवारी रोजी भरणार जागतिक दर्जाचे ‘सायन्स कार्निवल’

कल्याणच्या केंब्रिया इंटरनॅशनल शाळा – कॉलेजचा पुढाकार

कल्याण दि.१८ जानेवारी :
आपल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणच्या केंब्रिया इंटरनॅशनल शाळा – कॉलेजतर्फे आणखी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोबोटिक्स, 3डी, व्हीआर अशा अत्याधुनिक क्षेत्रांची माहिती इथल्या मुलांना होण्याच्या दृष्टिकोनातून केंब्रिया इंटरनॅशनलतर्फे जागतिक दर्जाच्या सायन्स कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. (Goodnews: World class ‘Science Carnival’ to be held in Kalyan)

50 हून अधिक वेगवेगळया विषयांची मिळणार माहिती…

येत्या 28 आणि 29 जानेवारी रोजी केंब्रीया इंटरनॅशनल शाळेमध्ये हे सायन्स कार्निवल आयोजित करण्यात आले आहे. ज्यामधे वेगवेगळ्या विषयांवरील सायन्स शो, 3 डी शो, डोम शो, स्लिमी सायन्स, बबललॉजी, प्लॅनेटेरियम, सायन्स लॅब, मॅजिक शो हे या कार्निवलचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यासोबतच मॅजिकल फ्लाईंग बॉल, इनव्हिजीबल इंक, व्होलकॅनो एक्सप्लोजन, सोलर दिवा, 3 डी टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक सायकल, रोबोटिक्स, हायड्रोफोनिक फार्मिंग, व्हर्चूअल रिॲलिटी, ऑटोनोमस कार, पोटेंशिओ मीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ऑटो फूड डिस्पेन्सर यासह तब्बल 50 विविध प्रकारच्या विषय जवळून पाहण्याची संधी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या कार्निवलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी दिली. तर 2 ते 5 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक उपक्रमही या कार्निवलमध्ये होणार आहेत.

कल्याणात आयोजित करण्यात आलेले जागतिक दर्जाचे हे पहिलेच सायन्स कार्निवल असून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी ते पाहण्याची ही सुवर्णसंधी न दवडण्याचे आवाहनही केंब्रिया इंटरनॅशनलतर्फे करण्यात आले आहे.

सायन्स कार्निवल 2023

तारीख: 28 आणि 29 जानेवारी 2023

वेळ : दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत

ठिकाण : केम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल – कॉलेज, राधा नगर, खडकपाडा, कल्याण – पश्चिम 

या सायन्स कार्निवलमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क : 9833613947

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा