Home ठळक बातम्या डोंबिवलीजवळील खोणी गावात रानगव्याचे दर्शन ; व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीजवळील खोणी गावात रानगव्याचे दर्शन ; व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली दि.१८ जानेवारी :

कल्याण पुर्वेमध्ये बिबट्या येऊन काही महिनेही उलटले नसताना आता डोंबिवलीजवळील खोणी गावाजवळ रानगव्याचे दर्शन झाले आहे. आज सकाळी या ठिकाणी फिरायला गेलेल्या नागरिकांना हा रानगवा आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. (Sighting of Ranagava at Khoni village near Dombivli; The video went viral)

काही आठवड्यांपूर्वी वांगणी परिसरातही रानगव्याचे दर्शन झाले होते. त्यामूळे तिकडून जंगलाच्या दिशेने हुसकावून लावल्यानंतर हा रानगवा डोंबिवलीजवळील खोणी भागात आला असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नेहमीप्रमाणेच आज सकाळी काही जण खोणी गावाजवळील परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक हा रानगवा त्यांच्या नजरेस पडला. आणि या नागरिकांनीही त्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान कल्याण पूर्वेतील रहिवासी वस्तीत काही महिन्यांपूर्वी बिबट्या आला होता. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीजवळील खोणी गावात रानगव्याचे दर्शन झाले आहे. एकीकडे जंगली प्राण्यांच्या रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात झालेले सिमेंटच्या जंगलाचे अतिक्रमण हेच त्यामागचे कारण असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात जंगली प्राणी रहिवासी भागात येण्याच्या घटना आता वाढतच जातील हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा