Home ठळक बातम्या कल्याणातील हायटेक फेसेस सलोन आणि अकॅडमीचे डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याणातील हायटेक फेसेस सलोन आणि अकॅडमीचे डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

कल्याण दि.28 ऑगस्ट :
फेसेस या अत्याधुनिक सलोन आणि अकॅडमीचे आज केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. फोटो व्यवसायातील एक दिग्गज नाव असणाऱ्या कल्याणातील भाटिया कुटुंबियांतर्फे या व्यवसायाच्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यात आले आहे. (Hi-Tech Faces Salon and Academy in Kalyan Inauguration by Dr. Prashant Patil)

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा चौकात ही फेसेस सलोन आणि अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. यातील सलोनचे उद्घाटन डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते सलोनचे तर अकॅडमीचे उद्घाटन अजित भाटिया यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आले.

याठिकाणी सलोन आणि ब्युटी पार्लरमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा अतिशय हायटेक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अजित भाटिया यांनी दिली. हे संपूर्णपणे एक फॅमिली सलोन असून अतिशय वाजवी दरात लोकांना आम्ही चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवणार असल्याचेही ते म्हणाले. तर यासोबतच युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने आम्ही याठिकाणी सलोन अकॅडमीही सुरू केली आहे. त्याची फीही संस्थांच्या तुलनेत कमी ठेवण्यात आली असून आठवी, दहावी पास असणारे विद्यार्थीही आमच्याकडे कोर्स करू शकतील. आजच्या काळात हेअर स्टाईलस्ट हे एक असे कौशल्य आहे ते आत्मसात करणारी व्यक्ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपले पोट भरू शकेल असा विश्वासही अजित भाटिया यांनी यावेळी व्यक्त केला.

तर आपल्या शाळेतील, कॉलेजातील माझा एक चांगला मित्र आज व्यवसायाच्या एका नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. याठिकाणी ते केवळ वयवसायच करणार नसून अतिशय कमी दरात समाजातील होतकरू मुला मुलींना आपल्या अकादमीमध्ये शिकवणारही आहेत. ही अत्यंत चांगली संकल्पना असल्याची प्रतिक्रिया केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि उद्घाटक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

यावेळी अजित भाटिया यांच्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक आप्तेष्ट आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा