Home ठळक बातम्या कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग; अग्निशमन दल घटनास्थळी

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग; अग्निशमन दल घटनास्थळी

कल्याण दि.16 मार्च :
कल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग (fire kalyan dumping ground) लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र खाडीच्या दिशेने आग लागलेली असल्याने वाऱ्यामुळे ती मोठ्या प्रमाणात पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांची आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. (kdmc)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा