Home ठळक बातम्या नालेसफाई नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी – कंत्राटदारांची गय करणार नाही...

नालेसफाई नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी – कंत्राटदारांची गय करणार नाही – आमदार विश्वनाथ भोईर यांचा संतप्त इशारा

केडीएमसीला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम

कल्याण दि.31 मे :
केडीएमसीला नालेसफाईसाठी पाच दिवसांचा अल्टीमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरांतील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत केडीएमसीला हा इशारा दिला.(if-the-nullah-are-not-cleaned-properly-kdmc-officials-the-contractors-will-not-spare-angry-warning-of-mla-vishwanath-bhoir)

केडीएमसी अधिकाऱ्यांना धरले चांगलेच धारेवर…

पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र कल्याण पश्चिमेतील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार भोईर यांनी आज तातडीने कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी या नाल्यांमध्ये कचरा तसाच साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले. यावेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हा जनतेचा पैसा आहे, कोट्यावधींची उधळपट्टी होऊ देणार नाही – आमदार विश्वनाथ भोईर

नाले सफाईसाठी केडीएमसीकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच यावेळी केडीएमसी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे आमदार भोईर यांना सांगितले. मात्र नालेसफाई झाली असे तुम्ही सांगता मग नाल्यात हा कचरा आणि गाळ कसा काय आहे? ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही. लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात असे सांगत पुढील 5 दिवसांत कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झाली पाहिजे. आपण पाच दिवसांनी पुन्हा पाहणी करू आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची आपण कोणतीही गय करणार नाही असा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा