Home ठळक बातम्या जबरदस्ती वीजबिल वसुली थांवली नाही तर महावितरणचे कार्यालय पेटवू – मनसेचा इशारा

जबरदस्ती वीजबिल वसुली थांवली नाही तर महावितरणचे कार्यालय पेटवू – मनसेचा इशारा

कल्याण दि.15 मार्च :
थकीत वीजबिल वसुलीविरोधात महावितरणची जोरदार मोहीम सुरू असून जबरदस्ती वीजबिल तोडणी थांबवली नाहींतर महावितरणचे कार्यालय पेटवून देण्याचा इशारा मनसेने (If the recovery of electricity bill is not stopped, MSEDCL office will be set on fire – MNS warns) दिला आहे. वीजबिल वसुली मोहिमेविरोधात कल्याण पूर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत त्यांना मेणबत्ती भेट दिली. तसेच काही काळ महावितरण कार्यालयातील ट्युबलाईट आणि पंखे बंद ठेवत आपला निषेध व्यक्त केला.

राज्यात सर्वत्र वीजबिल वसुलीविरोधात महावितरणने मोहीम सुरू केली आहे. थकीत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असून मनसेने त्याला आक्षेप घेतला आहे. यविरोधात जाब विचारण्यासाठी कल्याण (kalyan) पूर्वतील मनसैनिकानी ( maharashtra navnirman sena)  आज महावितरण कार्यालयाला भेट दिली. तसेच या कार्यालयातील वीजपुरवठा काही काळ बंद करत महावितरण अ?धिकाऱ्यांना मेणबत्त्या भेट दिल्या. योग्य पद्धतीने वीजबिल वसुलीला आमचा विरोध नाही मात्र दादागिरी करून इंग्रजांप्रमाणे सुरू असणारी कारवाई त्वरित थांबवणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढे पेटत्या मेणबत्या देण्यासह कार्यालयही पेटवून देऊ असा गंभीर इशारा मनसेचे कल्याण पूर्व उपाध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी दिला.
यावेळी गव्हाणे यांच्यासह मनविसे शहराध्यक्ष निर्मल निगडे, विधानसभा अध्यक्ष अनंत गायकवाड, उपशहराध्यक्ष अंकुश राजपूत, वाहतूक सेना उपाध्यक्ष गणेश सोनवणे, महेंद्र कुंदे, विलास गिरी, जितेंद्र वाकचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा