Home ठळक बातम्या श्रेय घ्यायचे तर घ्या पण जनतेला दिलासा द्या – मनसे आमदार राजू...

श्रेय घ्यायचे तर घ्या पण जनतेला दिलासा द्या – मनसे आमदार राजू पाटील

पलावावासीयांना कर न भरण्याचे आवाहन

कल्याण ग्रामीण दि.16 मार्च :
कल्याण ग्रामीण भागातील पलावा ही शासन मान्य स्मार्ट सिटी असून सदनिका धारकांना ६६℅ कर आकरणीत सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र त्यानंतरही कर सवलत मिळत नसल्याने नागरिकांनी करभरणा बंद केलं आहे. परिणामी केडीएमसीने या लोकांना सदनिका जप्तीच्या नोटीसा धाडल्या आहेत. यामध्ये राजकरण होत असल्याचे सांगत श्रेय घ्यायचे तर घ्या पण जनतेला दिलासा द्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याण ग्रामीण भागातील पलावा सिटीमध्ये असलेल्या गोल्फलिंग, कॅसाबेला, कॅसाबेला गोल्ड आणि कॅसा रिओ येथील मालमत्ता धारकांना नियमानुसार ६६ % कर सवलत मिळण्यासाठी आमदार प्रमोद(राजू) पाटील हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. यासंदर्भात केडीएमसी आयुक्तांसोबत अनेक बैठका होऊन त्यात प्रशासनाकडून कर सवलतीचे आश्वासन दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णय होत नसून आता तर इथले सदनिकाधारक कर भरण्यास इच्छुक नाहीत. तसेच केडीएमसीने आता थेट सदनिका जप्तीच्या नोटीसा दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगत ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांडगे यांनी भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील स्मार्ट वसाहतींना सवलती देण्याचा निर्णय घेतला. परंतू हाच निर्णय घेण्यास केडीएमसी आयुक्त टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी कल्याण शीळ मार्गावर मोठे होर्डिंग लावून लोकांनां कर न भरण्याचे आवाहन केले आहे.

आपण सेवा घेतो तर टॅक्स भरायलाच पाहिजे मात्र…

“कोणतेही कर भरू नका अशी भूमिका आमची कधीच नाही. आपण सेवा घेतो तर टॅक्स भरायलाच पाहिजे, परंतु पलावामध्ये दुहेरी कर आकारला जात आहे. नियमानुसार अशा प्रकल्पांना ६६% सवलत देणे आवश्यक असतानाही दिली जात नाहीये. येथील सदनिका धारकांना बसणाऱ्या दुहेरी कररुपी भुर्दंडामुळे आपण ते होर्डिंग लावल्याची प्रतिक्रियाही आमदार राजू पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा