Home ठळक बातम्या डोंबिवलीत कर्णबधीर मुलांनी लुटला दहीहंडी फोडण्याचा आनंद

डोंबिवलीत कर्णबधीर मुलांनी लुटला दहीहंडी फोडण्याचा आनंद

दिपेश म्हात्रे फाऊंडेशनचा सामाजिक पुढाकार


डोंबिवली दि.१९ ऑगस्ट :
दोन वर्षानंतर होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा कल्याण डोंबिवलीत चांगलाच उत्साह दिसत आहे. अनेक राजकारणी आणि नामांकित संस्थांतर्फे कल्याण डोंबिवलीत दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला असला तरी डोंबिवलीतील दिपेश म्हात्रे फाऊंडेशनची कर्णबधीर मुलांसाठी आयोजित दहीहंडीने सर्वांची मने जिंकली.

कोरोनामुळे गेली 2 वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा होताना दिसत आहे. डोंबिवली पश्चिमेला दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक संदेश देणारी दहिहंडी सम्राट चौकात साजरी करण्यात आली.

डोंबिवलीतील ठाकूरवाडी येथील संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोषात ही हंडी फोडून उत्सवाची सुरुवात केली. आहेत. एकीकडे रिमझिम पावसाची बरसात तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्याचा या कर्ण बधीर मुलांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला होता.

तर याच ठिकाणी महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक अशा इतर दोन हंड्याही उभारण्यात आल्याचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा