Home ठळक बातम्या कल्याणात भरलेय स्थानिक 15 कलाकारांचे अनोखे कला प्रदर्शन

कल्याणात भरलेय स्थानिक 15 कलाकारांचे अनोखे कला प्रदर्शन

प्रकृती आर्ट फोरम संस्थेचा पुढाकार

कल्याण दि.15 एप्रिल :
कल्याणात प्रकृती आर्ट फोरम संस्थेतर्फे आजच्या कला दिनानिमत्त अनोखे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक 15 कलाकारांनी सहभाग घेतला असून पुढील 3 दिवस हे कला प्रदर्शन सुरू राहणार आहे. सुप्रसिद्ध युवा शिल्पकार जयदीप आपटे यांच्या हस्ते आज त्याचे उद्घाटन करण्यात आले.

स्थानिक कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतींना वाव मिळण्याच्या उद्देशाने प्रकृती आर्ट फोरम संस्था गेल्या 4 वर्षांपासून हे कला प्रदर्शन भरवत आहे. मात्र गेली 2 वर्षे कोवीडमुळे या प्रदर्शनात खंड पडला होता. मात्र सध्या कोवीडचे वातावरण बऱ्यापैकी निवळल्याने हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळेच प्रकृती आर्ट फोरमनेही पुन्हा हे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयोजक आणि कलाकार अमित बाळापुरकर यांनी दिली.

कल्याण पश्चिमेच्या गायन समाज इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन भरले असून त्यामध्ये पेंटिंग्ज, फोटोग्राफी, कॅरी केचर, हॅण्डमेड प्रोडक्ट, कॅलिग्राफी आदी कलाकृती प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ज्यामध्ये अथर्व दिक्षीत, अमित बाळापुरकर, गौरी बाळापुरकर, नंदिश सोनगिरे, मयूर कुलकर्णी, पियुषा देशपांडे, सुमेध मोडक, अक्षता पेठे, पल्लवी राऊत, आर्या पवार, हितेश्री समेळ, मिरा वैद्य, डॉ. शैलेश सोनार आणि रीता राजगोर या 15 स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकृती सादर केल्या आहेत.

आजपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 17 तारखेपर्यंत सुरू राहणार असून 17 तारखेला संध्याकाळी शिल्पकार जयदीप आपटे हे सर्वांसमोर शिल्प कलाकृती (लाईव्ह डेमो) साकारणार असल्याची माहिती अमित बाळापुरकर यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा