Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून संततधार पाऊस; वीजपुरवठ्यावरही परिणाम

कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून संततधार पाऊस; वीजपुरवठ्यावरही परिणाम

कल्याण – डोंबिवली दि.17 मे :
तौक्ते (cyclone taukate) चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस पडतोय. त्यामुळे काही भागात वीज पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. (Incessant rain from midnight in Kalyan Dombivali; Effects on power supply)

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते (cyclone taukate) चक्रीवादळामूळे प्रशासनातर्फे सर्वत्र खबरदारी आणि सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून रविवारी मध्यरात्रीपासून कल्याण आणि डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. तर मध्येच जोरदार वारेही वाहत असून काही ठिकाणी सोमवारी सकाळी काही तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. जो सकाळी साडे आठच्या सुमारास पुन्हा पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले. तर मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा