Home ठळक बातम्या Cyclone Taukte Effect Live update : कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी झाडं पडली, इमारतींचे...

Cyclone Taukte Effect Live update : कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी झाडं पडली, इमारतींचे पत्रे उडाले

दुपारी 3 वाजून 41 मिनिटं : जोरदार वाऱ्यांमुळे कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या गच्चीवरील पाण्याची टाकी उडून खाली पडली…सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..

दुपारी 2 वाजून 52 मिनिटं : कल्याण -शिळ मार्गावर भलेमोठे होर्डींग गाडीवर कोसळले… अपघातात 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती…कटर आणि जेसीबीच्या साहायाने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूला केले होर्डींग… डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडकर यांची माहिती…

दुपारी 2 वाजून 27 मिनिटं : कल्याणात गोदरेज हिल टेकडीवर जाणाऱ्या रस्त्यावर झाडासोबत कोसळला मातीचा ढिगाराही…गाड्यांच्या येण्या जाण्याची होतेय गैरसोय….

दुपारी 2 वाजून 13 मिनिटं : डोंबिवलीच्या टिळक नगर भागातील सोसायटीच्या गच्चीवरील सिमेंटचे पत्रे रस्त्यावर कोसळले… सुदैवाने कोणालाही दुखापत नाही…

दुपारी 2 वाजून 4 मिनिटं : जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण पश्चिमेतील व्हरटेक्स या नामांकित सोसायटीतील पत्रे उडून पडले… सुदैवाने कोणाला दुखापत नाही…

दुपारी 1 वाजून 47 मिनिटं : कल्याणच्या कोळीवाडा परिसरातील मंदिराच्या मागे झाड उन्मळून पडले…सुदैवाने कोणालाही दुखापत नाही…

दुपारी 1 वाजून 21 मिनिटं : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात विजेच्या तारांवर झाडं कोसळली…जाईबाई शाळेजवळील प्रकार…वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्युत पुरवठाही झाला खंडीत…

दुपारी 1 वाजून 12 मिनिटं : जोरदार वाऱ्यांमुळे कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातील
पोलीस चौकी उलटली…सुदैवाने कोणालाही दुखापत नाही…

12.50 मिनिटं : कल्याण पश्चिमेतील वाडेघर गावातील श्रमिक सोसायटीत वाहनांवर झाड कोसळले… सुदैवाने कोणालाही दुखापत नाही…मात्र गाडीसह वीज वाहिन्यांचे नुकसान…

सकाळी 12.30 वाजता : डोंबिवली रेल्वे स्टेशनमधील 6 नंबर मार्गावरील ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याची प्राथमिक माहिती…जोरदार वाऱ्यामुळे कोसळले झाड…लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता…

सकाळी 11.45 वाजता : कल्याणच्या विविध भागात झाडं पडल्याच्या घटना…रामबाग परिसर आणि बेतूरकर पाडा परिसरात झाडं पडल्याची प्राथमिक माहिती…

सकाळी 10.30 वाजता : कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून वाहताहेत वादळी वारे…काही ठिकाणी रस्त्यावर झाडं पडल्याच्या घटना घडल्याची प्राथमिक माहिती…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा