Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी इंदुराणी जाखड ;आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी इंदुराणी जाखड ;आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी

महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्सच्या एम.डी.पदी डॉ. भाऊसाहेब दांगडे

कल्याण डोंबिवली दि.18 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विद्यमान आयुक्तांची बदली झालं असून आयुक्तपदी डॉ. इंदूराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांच्या रूपाने कल्याण डोंबिवली महापालिकेला पहिल्यांदाच महिला अधिकारी आयुक्त म्हणून लाभल्या आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. तर डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या एमडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Indurani Jakhar as Commissioner of Kalyan Dombivli Municipal Corporation; first woman officer as commissioner)

डॉ. इंदूराणी जाखड या राज्याच्या महिला विकास महामंडळाच्या एमडी म्हणून (व्यवस्थापकीय संचालक) कार्यरत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदासह त्यांना पुढील आदेश येईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. डॉ. इंदूराणी जाखड यांची प्रशासकीय श्रेणी पाहता कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपद वरिष्ठ श्रेणीत अवनत करण्यात आल्याचेही शासनाने पत्रात नमूद केले आहे.

डॉ. जाखड कल्याण डोंबिवलीच्या विकासात चांगले योगदान देतील – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रशासकीय स्तरावर चांगले काम केले असून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून येणाऱ्या काळात त्यांचे चांगले योगदान असेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनामधील त्या वरिष्ठ अधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यामातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, यूडी आणि राज्य सरकार विविध योजनेंतर्गत रस्त्यांची विकासकामे उड्डाणपूलाची जलदगतीने झाली पाहिजेत. डॉ. जाखड या ही सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करतील असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नविन आयुक्त मॅडम चांगले बदल करतील – आमदार राजू पाटील

राज्य सरकार कल्याण डोंबिवलीतील नवनविन आयुक्तांची बदली त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच करून टाकतात. आमच्याकडे आयुक्त फेरीवाल्यांसारखे येतात आणि जातात. परंतु आमच्या स्टेशनबाहेरील फेरीवाले काही उठवले जात नाहीत. आता येणाऱ्या नविन आयुक्त मॅडम नक्कीच चांगले बदल करतील अशी आशा करुया. अशा शेलक्या शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान या सर्व लोकप्रतिनिधिंसह कल्याण डोंबिवलीकरांच्या अपेक्षा नव्या आयुक्त मॅडम कितपत पूर्ण करतील हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा