Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात अवघ्या आठवड्याभराच्या पावसाने ओलांडली महिन्याची सरासरी

ठाणे जिल्ह्यात अवघ्या आठवड्याभराच्या पावसाने ओलांडली महिन्याची सरासरी

कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडीचा समावेश

कल्याण डोंबिवली दि. 1 जुलै :
जून महिन्याच्या अखेरीस येऊनही पावसाने अवघ्या आठवड्याभरात आपला बॅकलॉग भरून काढल्याचे ठाणे जिल्ह्यातील पावसाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडीमध्ये सरासरीपेक्षा ( ॲव्हरेज ) अधिक पाऊस झाला आहे.

पावसाने गेल्या शनिवार – रविवारपासुन कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ठाण मांडले आहे. पाउस सुरु होऊन आज बरोबर एक आठवडा झाला आहे. मात्र या सात दिवसातच पावसाने अक्षरशः एसकेआर प्रमाणेच जोरदार बॅटिंग करत महिन्याचा टप्पा ओलांडला. कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर अंबरनाथ आदी ठिकाणी जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये जून महिन्यातील पावसाची टक्केवारी

ठाणे – 92.4
कल्याण डोंबिवली – 115.7
मुरबाड – 72.2
भिवंडी – 123.7
शहापूर – 95.3
उल्हासनगर – 114.9
अंबरनाथ – 127.2

हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत स्थानिक पातळीवरील पावसाची आकडेवारी

बदलापूर – 167mm
ठाणे – 90
नवी मुंबई – 82
दिवा – 83
मुंब्रा – 80
डोंबिवली – 75
कल्याण – 80
उल्हासनगर – 74
आंबिवली – 69
टिटवाळा – 66

ठाणे जिल्ह्यातील जून महिन्यातील पाऊस आणि (सरासरी) मिलिमीटरमध्ये
ठाणे ५६४ (६००)
रबाळे, नवी मुंबई ५८४ (५७०)
मुंब्रा ६६५ (५८०)
भिवंडी ७१७ (५५०)
डोंबिवली ५६० (५३०)
कल्याण ६०४ (५२०)
उल्हासनगर ५२० (५१०)
अंबरनाथ ५६० (५००)
बदलापूर ७६५ (५००)
शहापूर ४३८ (४५०)
मुरबाड ४८४ (४५०)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा