Home कोरोना कल्याण डोंबिवली महापालिकाही उभारणार 2 ऑक्सिजन प्लांट

कल्याण डोंबिवली महापालिकाही उभारणार 2 ऑक्सिजन प्लांट

कल्याण-डोंबिवली दि.24 एप्रिल :

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हवेतून ऑक्सिजन शोषून घेत ऑक्सिजनची निर्मिती करणारे 2 प्लांट उभारणार आहेत. याबाबत 2 कंपन्यांना वर्कऑर्डर देण्यात आली असून खासगी कोविड रुग्णालयांनीही असे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.(Kalyan Dombivali Municipal Corporation will also set up 2 oxygen plants )

कल्याण डोंबिवलीतील कोवीड रुग्णालयांनाही ऑक्सिजनची कमतरता भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केडीएमसीनेही स्वतःचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. या प्लांटमध्ये उभारण्यात येणारी यंत्रणा हवेतील ऑक्सिजन शोषून ऑक्सिजन प्लांटला पुरवठा करणार आहे. या प्लांटमधून  24 तासाला सुमारे 175 ते 200 जंबो सिलेंडर भरतील इतका ऑक्सिजन निर्माण होईल. हे ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित होण्यासाठी सुमारे 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्लांटमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन महापालिका नव्याने उभारत असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये वापरला जाणार असून रुग्णांना मोठा दिलासा मिळण्यात मदत होणार आहे. तर केडीएमसीप्रमाणे खासगी रुग्णालयांनीही अशाच प्रकारचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा