Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १२६ मिलीमीटर पावसाची नोंद

कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १२६ मिलीमीटर पावसाची नोंद

 

कल्याण डोंबिवली दि. १२ जुलै :
कल्याण डोंबवलीत गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांचा विचार करता ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबवलीत सर्वाधिक म्हणजेच १२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने आपला बॅकलॉग भरण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कल्याण डोंबिवलीला अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये १२६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत ७१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

 

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी

ठाणे – ८७.१ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ७२३.३ मिलीमीटर)

कल्याण डोंबिवली – १२६.५ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ७१६.३ मिलीमीटर)

मुरबाड – १०१ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४८६ मिलीमीटर)

भिवंडी – १०५ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ७१६ मिलीमीटर)

शहापूर – १११ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ६९६ मिलीमीटर)

उल्हासनगर – १०१ मिलीमीटर
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ७०६मिलीमीटर)

अंबरनाथ – ११२ मिलीमीटर
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ७७१ मिलीमीटर)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा