Home ठळक बातम्या ऊफ ये गर्मी : सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवलीचा पारा चाळीशीपार

ऊफ ये गर्मी : सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवलीचा पारा चाळीशीपार

कल्याण डोंबिवली दि.11 एप्रिल :

एकीकडे राजकीय वातावरणाचा पारा दररोज नवनवे उच्चांक गाठत असताना कल्याण डोंबिवलीमध्येही कालपासून चांगलीच हीट जाणवत आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील ही हीट (सध्या तरी) राजकारणाची नसून तापमानाची आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवली शहरामध्ये पाण्याने चाळीशी पार केल्याचे दिसून आले.

कल्याण डोंबिवली आणि परिसरातील शहरांमध्ये सूर्यनारायण कालपासून जणू काही आग ओकू लागला आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच वातावरणातील हा बदल आणि तापमान वाढीचा अंदाज येऊ लागला आहे दुपारी 12 नंतर तर बाहेर पडणेही अतिशय कठीण झाले असून उन्हाच्या झळा जीव नकोसा करत आहेत.

कल्याण डोंबिवली शहरांचा विचार करता आज या दोन्ही ठिकाणी पाण्याने चाळिशी ओलांडलेली पाहायला मिळाली कल्याणमध्ये 40.3 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीमध्ये 40.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. कालही कल्याण डोंबिवलीतील पारा 40° पर्यंत पोहोचला होता आज त्यात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळाली. पुढील दोन दिवस असेच चढे तापमान राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

तर संध्याकाळी सूर्यास्तानंतरही वातावरणातील उष्मा जाणवत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस असेच तापमान वाढीचे अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांतील तापमान

मुंबई ३६.२° सेल्सियस
कल्याण ४०.३
डोंबिवली ४०.१
विरार ३६.५
मीरा भाईंदर ३७.५
नवी मुंबई ३८.७
ठाणे ३९.५
मुंब्रा ३९.७
बदलापूर ४०.१
मुरबाड ४२
कर्जत ४२.२

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा