Home ठळक बातम्या ‘मला लाज वाटते…’ गाण्याच्या माध्यमातून केडीएमसी ट्रोल; डोंबिवलीकर मित्रांचे गाणे व्हायरल

‘मला लाज वाटते…’ गाण्याच्या माध्यमातून केडीएमसी ट्रोल; डोंबिवलीकर मित्रांचे गाणे व्हायरल

कल्याण – डोंबिवली दि.25 सप्टेंबर :

कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडला असून त्यावर आता सोशल मीडियावर विविध माध्यमातून टिका केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांवरचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता डोंबिवलीकर तरुणांनी बनवलेलं गाणं सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

कल्याण डोंबिवलीतील प्रचंड खड्ड्यांमुळे ‘आता मला लाज वाटते’ या शब्दांत या तरुणांनी प्रशासनाला फटकारले आहे. ‘पाहुण्याना आणायला लाज वाटते’, ‘गाडी चालवायला लाज वाटते’ तर टॅक्स भरायला लाज वाटते’ असे सांगत त्यांनी केडीएमसी प्रशासनाला ट्रोल केले आहे.

कल्याण,डोंबिवली आणि 27 गावात सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहे. केडीएमसी, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी या सर्व प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रोजच अपघात होत असतात आणि त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. आतातरी प्रशासन जागे होणार का हे पाहावे लागेल?

https://youtu.be/cPOSW13wdM0

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा