Home कोरोना कोवीड रुग्णांच्या मदतीसाठी आता रात्रभर सुरू राहणार केडीएमसीची वॉररूम; हे आहेत नंबर

कोवीड रुग्णांच्या मदतीसाठी आता रात्रभर सुरू राहणार केडीएमसीची वॉररूम; हे आहेत नंबर

कल्याण -डोंबिवली दि.23 एप्रिल :
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत कोवीड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी  रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमसीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी धावपळ कमी करण्यासाठी केडीएमसीने मध्यवर्ती वॉररूमची उभारणी केली आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे ही वॉररूम संध्याकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.या मध्यवती वॉर रूममार्फत रूग्णासांठी रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट आदी महत्वपूर्ण सुविधांची माहिती पुरवली जाणार आहे.
त्यामुळे संबंधित व्यक्तींनी या मध्यवर्ती वॉर रुमशी सायंकाळी 6 ते सकाळी 10 यावेळेत 85913 77229 आणि  85913 73936 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

KDMC’s warroom will now continue overnight to help Covid patients; These are the numbers

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा