Home ठळक बातम्या कल्याणात पाईल्स, फिशर, फिस्टुलावर आता जर्मन तंत्रज्ञानाने लेझर उपचार उपलब्ध

कल्याणात पाईल्स, फिशर, फिस्टुलावर आता जर्मन तंत्रज्ञानाने लेझर उपचार उपलब्ध

शाश्वती हॉस्पिटलच्या डॉ. भारत भदाणे यांचा पुढाकार

कल्याण दि. २८ डिसेंबर :
मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की ‘अवघड जागेचे दुखणं सहनही होत नाही आणि सांगूही शकत नाही ‘. मात्र शरीराच्या या अवघड जागेची ही दुखणी आता अंगावर काढण्याची आणि कोणालाही न सांगता त्यांचा त्रास सहन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण पाईल्स (Piles – मूळव्याध), फिशर (Fissure) आणि फिस्ट्युला (fistula – भगंदर) अशा अवघड जागेच्या आजारांवर आता कल्याणच्या शाश्वती रुग्णालयात जर्मन तंत्रज्ञानाद्वारे अत्याधुनिक लेझर उपचार उपलब्ध झाल्याची माहिती डॉ. भारत भदाणे यांनी दिली.

तब्बल ६ हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया…

शाश्वती रूग्णालयाच्या माध्यमातून डॉ. भारत भदाणे हे गेल्या दहा वर्षांपासन या विविध अवघड जागेच्या आजारांवर उपचार करत आहेत. या दहा वर्षांत त्यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ६ हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. या क्षेत्रातील इतका मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी असून आतापर्यंत त्यांनी ५० हून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करत त्या माध्यमातून शेकडो गरीब रुग्णांवरही उपचार केले आहेत.

 

कोणत्याही वेदनेविना सहज होणारे लेझर उपचार…

तर पाईल्स (Piles – मूळव्याध), फिशर (Fissure) आणि फिस्ट्युला (fistula – भगंदर) सारख्या अवघड जागेच्या आजारांवर जर्मन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी एकाच छताखाली अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे पूर्वी या आजारांवरील शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला असह्य अशा वेदना व्हायच्या. मात्र आता उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक लेझर टेक्नॉलॉजीमुळे हे उपचार अत्यंत सहज आणि सोपे झाले आहेत. त्यासोबतच या लेझर टेक्नॉलॉजीमूळे शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना आता अत्यल्प आणि सुसह्य झाल्याची प्रतिक्रियाही डॉ. भारत भदाणे यांनी दिली. शाश्वती रूग्णालयामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरसोबतच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दिवसभर राहण्यासाठीही अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध आहे. आता नव्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवस रुग्णालयात थांबण्याची गरज उरलेली नाही.

या कारणांमुळे होतात हे आजार…
पाईल्स (Piles – मूळव्याध), फिशर (Fissure) आणि फिस्ट्युला (fistula – भगंदर) सारखे आजार होण्याचे एक प्रमूख कारण म्हणजे चुकीचे आजार आणि आपली बदललेली दिनचर्या. अति प्रमाणात मांसाहार, मद्यपान, अवेळी खाणे, अती तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, बैठे काम आदी प्रमूख कारणांमुळे हे आजार होण्याची शक्यता बळावत असल्याची महत्वपूर्ण माहिती डॉ. भदाणे यांनी दिली.

अत्यंत माफक दरात उपचार उपलब्ध…

मात्र शाश्वती रुग्णालयात उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक उपचारांमुळे रुग्णांनी या आजारांविषयी आता अजिबात भिती बाळगण्याची किंवा महिला वर्गाने ते अंगावर काढण्याची गरज नाही. तर हे सर्व उपचार शाश्वती रुग्णालयात अत्यंत माफक दरात उपलब्ध असून या आजारांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्यावर उपचार घेतल्यास शस्त्रक्रियेची अजिबात आवश्यकता पडत नसल्याचेही डॉ. भारत भदाणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शाश्वती रुग्णालय –
२०१, वारणा सोसायटी, हिना गार्डनजवळ, मुंबई युनिव्हर्सिटीच्या पाठीमागे, कल्याण – पश्चिम

वेबसाईट : www.shashwatiinpiles.com

अपॉइंटमेंटसाठी संपर्क : 77770 01480/ 98907 72802

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा