Home ठळक बातम्या डीमॉनीटायजेशन प्रमाणे 4 जूननंतर देशात डी मोदीटायजेशन होणार – उध्दव ठाकरे यांचा...

डीमॉनीटायजेशन प्रमाणे 4 जूननंतर देशात डी मोदीटायजेशन होणार – उध्दव ठाकरे यांचा घणाघात

डोंबिवलीमध्ये भर पावसात झालेल्या सभेत विरोधकांचा समाचार

डोंबिवली दि.17 मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये यावेळी 25 सभा घेतल्या असून आज उद्याही त्यांची सभा होईल. मात्र पंतप्रधान म्हणून त्यांच्या या शेवटच्या सभा आहेत. काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे डी मॉनीटायजेशन झाले होते तसे आता चार जूननंतर डी मोदीटायजेशन करणार असल्याची टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ते डोंबिवलीत आले होते. डोंबिवलीत काल भर पावसातही उध्दव ठाकरे यांनी भाजपसह आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. (Like demonetization, there will be demoditization in the country after June 4 – Uddhav Thackeray)

हे मोदी सरकार नाहीये तर गजनी सरकार…
भाजपला राजकारणामध्ये पोरं होत नाहीत यात माझा काय दोष? त्यामुळेच भाजपने आपले वडील आणि पोरंही चोरल्याचा घणाघातही ठाकरे यांनी केला. तर तुम्ही जर शब्दांचे पक्के असाल तर 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे. ते गेल्या दहा वर्षांत झोपलेले नाहीयेत. आपण दोन दिवस झोपलो नाहीतर डोक्याला झिणझिण्या येतात. ते गेल्या दहा वर्षांमध्ये झोपलेले नसल्याचे सांगतात , मग काय परिस्थिती झाली असेल त्यांची? हे मोदी सरकार नाहीये तर गजनी सरकार असल्याचे टीकास्त्रही त्यांनी यावेळी सोडले.

महाराष्ट्राचे गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करून देणार…
तर या निवडणुकीत महाराष्ट्रात नव्हे तर देशातही इंडी आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे हे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ असे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच ज्यांना मोठे केले ते गद्दार झाले असून चार तारखेपर्यंत थांबा, आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरणाऱ्यांचा फुगा चार तारखेनंतर आपण फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आणि येत्या निवडणूकीत महा विकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा