Home ठळक बातम्या दिवाळीपूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत करा – केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

दिवाळीपूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत करा – केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

(फाईल फोटो)

कल्याण – डोंबिवली दि.20 ऑक्टोबर :
दिवाळीपूर्वी कल्याण डोंबिवलीतील सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करण्याचे आयुक्तांचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील रस्त्‍यांवरील खड्डे भरणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज शहर अभियंता सपना कोळी -देवनपल्ली आणि संबंधित कार्यकारी अभियंतासोबत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले.

प्रत्यक्षात पावसाने विश्रांती घेतल्यावर, ख-या अर्थाने दस-यानंतर रस्ते दुरुस्ती/खड्डे भरणीच्या कामास प्रारंभ झाला असून आता सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तर ठेकेदारांनी वेळेत काम न केल्यास आणि कामाची गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याच्या सुचनाही आयुक्तांनी या आढावा बैठकीत दिल्या आहेत. तसेच शहर अभियंत्यांनी सर्व ठेकेदारांची बैठक बोलवून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम जलदगतीने होण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान महापालिका परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी महानगरपालिकेने 8 ऑक्टोबर रोजी 18002330045 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला होता. या टोल फ्री क्रमांकावर आतापर्यंत 296 तक्रार प्राप्त झाल्या असून त्यापैकी काही तक्रारी पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग) काही एमएसआरडीसी तर काही तक्रारी एमआयडीसी संबंधित आल्या होत्या. त्याबाबत संबंधितांना कळवण्यात आल्याचे सांगून या टोल फ्री क्रमांकावर एकाच रस्त्याच्या वारंवार तक्रारी आल्याचेही केडीएमसीतर्फे सांगण्यात आले. त्यापैकी महत्वाच्या मुख्य रस्त्यांवरील 48 तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचेही केडीएमसीने स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा