Home ठळक बातम्या मराठा आरक्षण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाला सुरुवात

मराठा आरक्षण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाला सुरुवात

नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

कल्याण डोंबिवली दि.24 जानेवारी :
राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Maratha Reservation: Survey begins in Kalyan Dombivli Municipal Corporation area)

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपणा तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार केडीएमसी क्षेत्रातही पुढील आठवडाभर म्हणजे ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण करण्याकरीता महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभागनिहाय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेतील कर्मचारी, एएनएम आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या सर्व संबधित कर्मचा-यांना ओळखपत्र देखील देण्यात आले आहेत. सर्वेक्षणाच्या कामाकरीता कर्मचारी, मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरीकांच्या घरी येणार आहेत.

या सर्वेक्षणाकरीता आवश्यक असलेल्या प्रश्नांची उत्तरे नागरीकांनी अचुकपणे देऊन कर्मचा-यांना आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा