Home ठळक बातम्या कल्याणात ‘रोजगार आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या हजारो संधी

कल्याणात ‘रोजगार आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या हजारो संधी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन

कल्याण दि.23 जानेवारी :
कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.

30 हून अधिक नामांकित खासगी कंपन्यांचा सहभाग
एकीकडे राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला राज्यभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना आता कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्याच धर्तीवर रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये नवी मुंबई, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर आणि ठाणे कल्याण भागातील 30 हून अधिक नामांकित खासगी कंपन्यांचा सहभाग आहे. तर शासकीय विभागातील काही निवडक पदेही या मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

26 प्रमूख क्षेत्रातील 4 हजार रिक्त पदे
चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, ई कॉमर्स, हॉटेलिंग, ओव्हर सीज आदी 26 प्रमूख क्षेत्रातील 4 हजार रिक्त पदे यावेळी भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याणमधील अधिकाधिक इच्छुकांनी कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील साई हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क 8080676865/7506471209

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा