Home कोरोना कोवीड लसीकरणावरून आमदार रविंद्र चव्हाण आक्रमक; डोंबिवलीत केंद्र वाढवण्याची मागणी

कोवीड लसीकरणावरून आमदार रविंद्र चव्हाण आक्रमक; डोंबिवलीत केंद्र वाढवण्याची मागणी

 

डोंबिवली दि.22 मार्च :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या परिस्थितीवरून आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी प्रशासनावर ताशेरे ओढत डोंबिवलीमध्ये कोवीड लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणीही आमदार चव्हाण यांनी केली आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज कोवीड परिस्थितीबाबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डोंबिवली कल्याणला कोरोनाचा पुन्हा एकदा जीवघेणा विळखा बसत असून २०० वरून ४०० आणि काल तर ६५१ रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने शासनाकडे किती लसींची मागणी केली याचा पत्रव्यवहार दाखवण्याबाबत विचारणा केली. डोंबिवली पूर्वेची लोकसंख्या अधिक असतानाही महापालिकेकडून डोंबिवली पूर्वेच्या लसीकरण केंद्राचे नियोजन का केले नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची आयुक्तांकडे मागणी केली.

तर डोंबिवलीतील एम्स आणि आरआरसारख्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णशुश्रुषा सेवा असल्याने तिथे दैनंदिन लसीकरण क्षमता वाढविण्यात यावी जेणेंकरून अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर केडीएमसी प्रशासनाचा एकूणच भोंगळ कारभार असल्याने डोंबिवलीकर कल्याणकर धास्तावले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे प्रशासक म्हणून आपल्या कर्तव्यात आपण कमी पडत असल्याचे दिसत असल्याचा गंभीर आरोपही आमदार चव्हाण यांनी यावेळी केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा