Home ठळक बातम्या डोंबिवलीत खड्ड्यांविरोधात खड्ड्यात बसून मनसेचे आंदोलन

डोंबिवलीत खड्ड्यांविरोधात खड्ड्यात बसून मनसेचे आंदोलन

 

डोंबिवली दि.4 सप्टेंबर :
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला तरीही अद्याप शहरातील रस्ते खड्डेमय असल्याविरोधात डोंबिवलीमध्ये मनसेने खड्ड्यात बसून आंदोलन केले. यावेळी केडीएमसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कल्याण-डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य दिसून येत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असला तरी हे खड्डे भरण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याची मागणी केली जात आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने अखेर आज मनसेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केडीएमसी प्रशासनाविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर खड्ड्यात बसून ‘हाय हाय’चे नारे देण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा