Home ठळक बातम्या 15 दिवसांत खड्डे भरा नाहीतर तुम्हालाच खड्ड्यात भरू – मनसे आमदारांचा केडीएमसीला...

15 दिवसांत खड्डे भरा नाहीतर तुम्हालाच खड्ड्यात भरू – मनसे आमदारांचा केडीएमसीला अल्टीमेटम

 

कल्याण- डोंबिवली दि.30 सप्टेंबर :
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत मनसे आमदार राजू पाटील चांगलेच आक्रमक झाले असून ‘येत्या 15 दिवसांत खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यांत तुम्हाला भरू’ असा इशारा त्यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. आमदार राजू पाटील यांनी काल चक्कीनाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

कल्याण डोंबिवलीत झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावरून आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाला।चांगलेच धारेवर धरले. टक्केवारीत सगळं अडकलं आहे, सत्ताधारीच वाघाचा वाटा खात असून अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई करून काय होणार? वाघाचा वाटा कुणाकडे जातो असा संतप्त सवाल केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील काही रस्त्यांवर जणू खड्ड्यांची स्पर्धा लागली की काय असे चित्र आहे. महापालिकेने गेल्या आठ वर्षात केवळ खड्डे भरण्यासाठी तब्बल 114 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र एवढे पैसे खर्चूनही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याचे ते म्हणाले. तर यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने 12 कोटींच्या निविदा काढल्या होत्या. मात्र त्यानंतरहो खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

तसेच कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून अनेक महिन्यांपासून याबाबत आपण पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासनाने त्याकडे।लक्ष दिलेले नाही. या रस्त्याचे तर 95 टक्के देयक अदा करण्यात येऊनही त्या प्रमाणात काम मात्र झालेले नाही. तर मुंबईत ब्लॅकलिस्ट केलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचं काम दिलं असून सत्ताधारीच वाघाचा वाटा खातात.। त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था झाल्याची बोचरी टिका आमदार पाटील यांनी यावेळी केली. सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक सुरू आहे, ओरबडण्याचे काम सुरू आहे. मात्र आता सहनशिलतेला अंत झाला असून 15 दिवसात खड्डे भरले नाही तर त्यांनाच खड्ड्यात भरू असा इशारा आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा