Home ठळक बातम्या मुंबई रेल्वे पोलिसांच्या व्हॅनला भीषण आग; कल्याण – शिळ रोडववरील घटना

मुंबई रेल्वे पोलिसांच्या व्हॅनला भीषण आग; कल्याण – शिळ रोडववरील घटना

 

सुदैवाने चालकासह आरपीएफचे 3 जवान सुखरूप

कल्याण-डोंबिवली दि.18 ऑक्टोबर :
मुंबई रेल्वे पोलिसांच्या व्हॅनला भीषण आग लागल्याची घटना आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण- शिळ रोडवरील काटई नाका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांची ही व्हॅन कल्याण- शीळ रोडवरून कल्याणच्या दिशेने येत होती. या व्हॅनमध्ये गाडी चालकासह आरपीएफचे तीन जवान होते. काटई नाका परिसरात ही गाडी आली असता व्हॅनला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ गाडीबाहेर धाव घेतल्याने तिघेही सुखरुप बचावले.

तर अवघ्या काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण गाडीला आपल्या कवेत घेतले. आग लागल्यामुळे व्हॅनमधून अक्षरशः फटाके फुटण्याचे आवाज येत होते. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. मात्र तोपर्यंत आगीमध्ये व्हॅनचा अक्षरशः कोळसा झाला होता. तर या प्रकारामुळे कल्याण शिळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा