Home ठळक बातम्या नृत्यसाधना कथ्थक अकादमी – इव्हेंटसतर्फे कल्याणातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

नृत्यसाधना कथ्थक अकादमी – इव्हेंटसतर्फे कल्याणातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कल्याण दि.11. मार्च :
आपल्या कामाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कल्याणातील कर्तृत्ववान महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कल्याणातील नृत्यसाधना कथ्थक अकादमी आणि इव्हेंटस् तर्फे येथील सॉलीटेयर बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

डॉ. क्षमा आगरकर- कुलकर्णी यांच्या माध्यमातून गेल्या दिड दशकांपासून कल्याणात नृत्यसाधना कथ्थक अकदामीच्या माध्यमातून कथ्थक प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. कल्याणातील सर्व कलाकारांना आणि प्रशिक्षकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने नृत्यसाधना इव्हेंटस् च्या माध्यमातून महिला दिनाच्या या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. क्षमा आगरकर आणि संचालक गौरव कौशल यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कला, क्रिडा, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योजकीय, पोलीस, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील 30 महिलांना या शानदार सोहळ्यात केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. क्षमा आगरकर – कुलकर्णी यांच्या अतिशय सुंदर अशा देवी काली वंदनेने करण्यात आली. त्याचप्रमाणे नृत्य साधना कथक अकादमी व कल्याणातील इतर कथक व भरतनाट्यम शैलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर नृत्य प्रस्तुतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

ऐतिहासिक कल्याणात शहरात वेगवेगळ्या कलाकारांना एकत्रित करून संपूर्ण जगभरात आपल्या कल्याणच्या सांस्कृतिक परंपरेची नोंद होण्याच्या दृष्टीने आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजक डॉ. क्षमा आगरकर कुलकर्णी आणि गौरव कौशल यांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा