Home बातम्या संत मुक्ताई सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाश्वती रूग्णालयात आरोग्य शिबिर संपन्न

संत मुक्ताई सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाश्वती रूग्णालयात आरोग्य शिबिर संपन्न

कल्याण दि.26 फेब्रुवारी :
कोवीडकाळात अतिशय उल्लेखनीय काम केलेल्या वाशिंद येथील संत मुक्ताई संस्थेने आपला वर्धापन अनोख्या आणि सामाजिक पद्धतीने साजरा केला. संस्थेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील शाश्वती हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये रक्त तपासणी, नेत्र तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर, डेंटल चेक अप, कन्सल्टेशन, मोफत औषध उपचार पार पडले. यावेळी एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांचे सहकार्य लाभले. आणि या आरोग्य शिबिरात ७१ जणांनी या सेवेचा लाभ घेतला.

मानवाने कितीही प्रगती केली , सायन्स ने किती ही शोध लावले तरी मानवी रक्त आपण तयार करू शक्त नाही. अपघात झाल्यानंतर, प्रसूती वेळी आणि इतर काही आजारात अनेकदा तातडीने रक्ताची गरज लागते. त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. या उदात्त भावनेने शाश्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. भारत भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून हे कार्य यशस्वीरीत्या पार पाडले. या रक्तदान शिबिरासाठी संकल्प ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. तर संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.

डॉ. भारत भदाणे यांनी स्वतः रक्तदान करून समाजा पुढें एक आदर्श दाखवून दिला. त्यांची रक्तदान करण्याची ही १५ वी वेळ होती. डॉ. भदाणे यांच्या शाश्वती हॉस्पिटल येथे पाइल्स , फिशर,फिस्टूला, पायलोनिडल साइनस इ. आजारांवर क्षारसूत्र आणि लेज़र द्वारे माफक दरात उपचार केले जातात.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा