Home ठळक बातम्या शहाड परिसरात साचणाऱ्या पाणीप्रश्नी तातडीने उपाय योजना करा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल...

शहाड परिसरात साचणाऱ्या पाणीप्रश्नी तातडीने उपाय योजना करा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रशासनाला ताकीद

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माहिती दिल्यानंतर कपिल पाटील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणीला

कल्याण दि. २६ जून :
अवघ्या काही मिनिटांच्या पावसात वारंवार जलमय होणाऱ्या शहाड परिसराची केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने कपिल पाटील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी करत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शहाडमध्ये सतत पाणी साचण्याचा मुद्दा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कानावर घालत संबंधित परिसराला भेट देण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. (Plan for immediate solution to water crisis in Shahad area – Union Minister of State Kapil Patil warns the administration)

गेल्या ३ आठवड्यात झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसातही शहाड पुलाशेजारील परिसर मोठ्या प्रमाणात जलमय होत आहे. याठिकाणी उल्हासनगर परिसरातून मोठ्या प्रमाणत सांडपाणी होऊन पाऊस पडल्यावर हेच नाल्याचे पाणी ड्रेनेजमार्फत थेट सोसायटी आणि घरांमध्ये घुसते. गेल्या ३ आठवड्यात सतत ४ वेळा याठिकाणी पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे. याप्रश्नी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून पावसाळ्यात पुन्हा अशी घटना घडू नये याची काळजी घेण्याच्या सक्त ताकीद केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी रेल्वे, उल्हासनगर महानगरपालिका आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान आता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सक्त ताकीदीनंतर तरी हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.

यावेळी यावेळी मोहोने टिटवाळा भाजपचे मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजप वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर, कमलाकर घोलप, राणा सिंह, कुणाल मिरकुटे, अनुप सिंह, अझीम शेख, वर्षा सूथार, अंबिका नगरचेचेअरमन विजय हांडे, सेक्रेटरी संतोष रणदिवे, खजिनदार श्रीकांत खिसमतराव, अनिल सिंग, आशू शिंदे, पंकज पाचपिंडे, अरुण सिंह, अनिल मिश्रा, सुमन सांगळे, अनिता वर्पे तसेच अंबिका नगर,अवनी बिल्डिंग, ओम कृष्णा पुरम, खेमजी चाळीतील रहिवाशी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा