Home ठळक बातम्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या वाहतुकीत बदल

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या वाहतुकीत बदल

 

कल्याण दि.6 सप्टेंबर :
उद्या गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी असणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून बदल करण्यात आले आहेत. कल्याण पश्चिमेला बहुतांश दहीहंडी उत्सव हा प्रमूख चौकात साजरा होत असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. तो विचारात घेऊन ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल केले आहेत.

कल्याण शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, टिळक चौक, सुभाष चौक, साई चौक अशा महत्वाच्या ठिकाणी दहिहंडी उत्सवानिमित्त  गोविंदा पथकाची वाहने, गोविंदा पथके आणि दहिहंडी उत्सव पाहण्यास येणारा जनसमुदाय मोठ्या संख्येने येत असतो. त्यामुळे उद्या या वाहतुकीत पुढील बदल लागू करण्यात आले आहेत..

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-

प्रवेश बंद :– भिवंडीकडून दुर्गाडी चौक, लाल चौकी मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :-
अ) इथली मध्यम प्रकारची वाहने दुर्गाडी चौक येथून डावे बाजूस वळण घेवून पौर्णिमा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) ही हलकी वाहने (दुचाकी, कार, जीप, तीन चाकी टेम्पो, इ.) लालचौकी येथून डावे वळण घेवून आधारवाडी सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :- गोविंदा पथकांची वाहने कल्याण पश्चिम, लालचौकी येथील वासुदेव बळवंत फडके मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :– शिळ रोडने कोळसेवाडी कल्याण (पूर्व), कडून छ्त्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :-
अ) ही मध्यम प्रकारची वाहने पत्रीपूल येथे डावे बाजूस वळण घेवून गोविंदवाडी बायपासमार्गे इच्छित स्थळी जातील.
(ब) ही हलकी वाहने (दुचाकी कार, जीप, तीन चाकी टेम्पो, इ) गुरुदेव हॉटेल येथे डावे बाजूस वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :– गोविंदा पथकाची वाहने कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :– मुरबाड रोड आणि इंदिरानगर क्रॉस येथून संतोषी माता रोडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मधुरीमा स्वीटस्, रामबाग, लेन क्र. ४ येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने रामबाग, लेन क. ४. म्हसकर हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग मुभा :- गोविंदा पथकांची वाहने मॅक्सी ग्राउंड, कल्याण पश्चिम मैदानात पार्किंग करण्याची मुभा देण्यात येत आहे.

प्रवेश बंद :- मुरबाड रोडने सुभाष चौक, महात्मा फुले चौक मार्गे छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या आणि दिपक हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथून मोहम्मद अली चौक मार्गे छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मोहम्मद अली चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- अ) सदरची वाहने कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम, वल्लीपीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना ७ सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहणार असून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ती लागू राहणार नसल्याचे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा