Home ठळक बातम्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार 11 मे रोजी डोंबिवलीच्या काही भागांचा वीजपुरवठा राहणार बंद

देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार 11 मे रोजी डोंबिवलीच्या काही भागांचा वीजपुरवठा राहणार बंद

 

कल्याण दि.10 मे :
अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवार 11 मे रोजी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वीजग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर यासंदर्भात माहिती पाठवण्यात आली असून महावितरणतर्फे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Power supply to some parts of Dombivli will be cut off on Tuesday, May 11 for maintenance repairs)

डोंबिवली पूर्वेतील जोशी हायस्कूलजवळील 3 रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि या रोहित्रांवरील उच्च-लघुदाब वाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत. तसेच पावसाळ्यातील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी झाडांच्या फांद्या छाटणे, वेल दूर करणेसह रिजपरिंग, नटबोल्ट बदलणे, जीओडी मेंटेनन्स आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

बाजीप्रभू उपकेंद्रांतर्गत कोपर रोड, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली भागात सकाळी ११ ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर ठाकुर्लीतील पीव्ही रोड, छेडा रोड, पेंडसेनगर, ९० फीट रोड, चोळेगाव, हनुमान मंदीर परिसर, ठाकुर्ली स्टेशन, विवेकानंद सोसायटी, पंचायत बावडी, बालाजीनगर, नेहरू रोड, फडके रोड, फते अली रोड, गणेश मंदीर परिसर आणि सावरकर रोड भागात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

तर गरिबाचा पाडा फिडरवरील महाराष्ट्र नगर, सरोवर नगर, सह्याद्री नगर, मल्हार नगर, श्रीधर म्हात्रे चौक भागात सकाळी 9 ते दुपारी 12 तर काळू नगर फिडरवरील ठाकूरवाडी, काळू नगर, आनंद नगर आणि सम्राट नगरच्या काही भागाचा वीजपुरवठा दुपारी 2.30 ते अडीच ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा