Home ठळक बातम्या नरेंद्र मोदी यांची कल्याणात जाहीर सभा; कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे...

नरेंद्र मोदी यांची कल्याणात जाहीर सभा; कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार

10 मे रोजी कल्याण पश्चिमेत होणार सभा

कल्याण दि.28 एप्रिल :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा देशभरात धडाका सुरू असून येत्या 10 मे रोजी कल्याणातही नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.(Public meeting of Narendra Modi in Kalyan; Kapil Patil and Dr. Shrikant Shinde’s campaign trumpet will blow)

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन्ही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्याचप्रमाणे आता येत्या 10 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली.

तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंजावाताचे महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा विश्वासही भिंवडी लोकसभेच्या कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मोदींजींचे विचार ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता येत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा