Home ठळक बातम्या राहूल गांधी खासदारकी रद्द प्रकरण : केंद्र सरकारविरोधात कल्याणात काँग्रेसचा निषेध मोर्चा

राहूल गांधी खासदारकी रद्द प्रकरण : केंद्र सरकारविरोधात कल्याणात काँग्रेसचा निषेध मोर्चा

खासदारकी रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कल्याण दि.25 मार्च :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे. राहुल गांधींची रद्द केलेली खासदारकी म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करत कल्याणातही जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (Rahul Gandhi cancellation of MP case: Congress protest march in Kalyan against Central Govt)

गुजरातमधील सुरत कोर्टाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या निर्णयाचे देशभर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. कालपासूनच ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरत या निर्णयाचा आणि केंद्र सरकारचा विरोध करत आहेत.

कल्याणतही जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकारने संविधानिक कायद्याचे उल्लंघन करून आणि लोकशाहीची हत्या करत राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द केल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. तर मोदी सरकार लोकशाहीची गळचेपी करत असल्याचे सांगत राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांनी यावेळी दिला .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा