Home ठळक बातम्या इडीकडून राहुल गांधींची चौकशी : कल्याणात काँग्रेसची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

इडीकडून राहुल गांधींची चौकशी : कल्याणात काँग्रेसची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

कारवाई थांबवा अन्यथा जेलभारो आंदोलन – काँग्रेसचा इशारा

कल्याण दि.17 जून :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीने बजावलेल्या नोटीस आणि त्याबाबत सुरू असणाऱ्या चौकशीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ आज कल्याणातही काँग्रेसने इडीविरोधात निदर्शने केली. (Rahul Gandhi’s inquiry from ED: Congress Protests in front of tehsil office in Kalyan)

नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारप्रकरणी गेल्या 2 दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. या पार्शवभूमीवर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत. कल्याणमध्ये तहसील कार्यालयाबाहेर आज कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

देशात बेरोजगारी, महागाई वाढतेय, महिला अत्याचार वाढत आहे असे अनेक प्रश्न असताना भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर इडीचा दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करत दडपशाही, हिटलरशही सुरू असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. तसेच देशामध्ये लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम मोदी सरकारकडून सुरू असून त्याविरोधात भाजपचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात आंदोलन केलं जातं असल्याचेही पोटे यांनी सांगितलं. तसेच ही कारवाई थांबली नाही तर येत्या काळात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिला.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, कल्याण पश्चिम ब्लॉकअध्यक्ष विमल ठक्कर, सदस्य मुन्ना तिवारी, युवक काँग्रेसचे मनिष देसले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा