Home ठळक बातम्या क्या बात है : बऱ्याच वर्षांनी कल्याणकरांना झाले मोराचे दर्शन

क्या बात है : बऱ्याच वर्षांनी कल्याणकरांना झाले मोराचे दर्शन

 

कल्याण दि.17 जून :
कल्याण पश्चिमेच्या रिंग रोड परिसर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आज एक सुखद धक्का बसला रिंग रोडच्या शेजारी असलेल्या जंगली भागामध्ये आज कल्याणकरांना चक्क मोरांच्या जोडीचे दर्शन झाले. भूषण पाटील यांनी हे मोर आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

बऱ्याच वर्षांनंतर कल्याणमध्ये मोर आढळले आहेत. कल्याण पश्चिमेला राहणारे भुषण पाटील हे नेहमीप्रमाणे आजही रिंग रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना झाडांमधून काही मोठे पक्षी बाहेर येताना दिसले. त्यांनी नीट पाहिले असता हे पक्षी म्हणजे चक्क मोर असल्याचे त्यांना आढळले. मनातून अतिशय आनंदी झालेल्या भुषण पाटील यांनी मग क्षणाचाही विलंब न लावता आपला मोबाइल कॅमेरा काढून त्यामध्ये मोरांची ही जोडी कैद केली. आणि त्यानंतर बाळासाहेब एरंडे यांच्यामार्फत हा व्हिडीओ एलएनएनकडे पाठवला.

हे मोर नेमके कुठून आले याबाबत काहीही कल्पना नसली तरी गेल्या दोन-अडीच दशकांत काँक्रीटचे जंगल बनलेल्या कल्याणसारख्या शहरामध्ये मोर आढळणे ही नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची बाब ठरली आहे.
बहुदा पावसाने दिलेली ओढ यामुळे हेमोर आणि खाण्याच्या शोधामध्ये आले असावेत असा अंदाज आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा