Home कोरोना कल्याण डोंबिवलीकरांनो रेल्वे पास काढायचाय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती

कल्याण डोंबिवलीकरांनो रेल्वे पास काढायचाय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती

 

केडीएमसी क्षेत्रात या 6 स्टेशनवर मिळणार रेल्वे पास; महापालिका उभारणार हेल्पडेस्क

कल्याण – डोंबिवली दि.10 ऑगस्ट :
येत्या 15 ऑगस्टपासून कोविड लसीचे 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्‍यासाठी आणि रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटरशेजारी केडीएमसीतर्फे स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) उभारले जाणार आहेत. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 या दोन शिफ्टमध्ये महापालिका कर्मचारी या हेल्पडेस्कवर कार्यरत असणार आहेत.

“हे डॉक्युमेंट जवळ असणे आवश्यक…”
कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत (प्रिंट आउट) आणि फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र, त्याची छायांकित प्रत (प्राधान्याने आधारकार्ड) असणाऱ्या नागरिकांची सर्वप्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर या मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी (Verified) केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र आणि ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.

“केडीएमसी क्षेत्रातील या रेल्वे स्टेशनवर असणार सुविधा…”

महापालिका कार्यक्षेत्रातील टिटवाळा, आंबिवली, शहाड, कल्याण, ठाकुर्ली आणि डोंबिवली, या 6 रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची आणि फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी स्टेशनवर 0 येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे तिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

“प्रवास करण्यासाठी ही कागदपत्रे जवळ बाळगा…”
नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य आहे. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील. अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य असणार आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा