Home ठळक बातम्या कल्याणात पुस्तकरुपी प्रतिमेतून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कल्याणात पुस्तकरुपी प्रतिमेतून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कल्याण दि. 3 जानेवारी :

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती. त्यानिमित्त सावित्रीबाईंना कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाद्वारे 275 पुस्तकांच्या माध्यमातून सावित्रीबाईंची भव्य प्रतिमा साकारून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

चूल आणि मूल या संसाराच्या जोखडात अडकलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखवला. आणि आपल्या समजातील कित्येक स्त्रियांना आत्मनिर्भर होण्याचे त्यांनी बळ दिले. त्यांच्या या कार्याबद्दल कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातर्फे हे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पंधरा बाय 20 फुटी भव्य प्रतिमा साकारण्यात आली. यासाठी चा वेगवेगळ्या विषयांच्या 275 पुस्तकांचा वापर करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय, रामदास बोराडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी ही पुस्तक रुपी प्रतिमा साकारण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा