Home कोरोना केडीएमसी क्षेत्रातील 1 ली ते 7 वीच्या शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

केडीएमसी क्षेत्रातील 1 ली ते 7 वीच्या शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा घेतला जाणार निर्णय

कल्याण – डोंबिवली दि.1 डिसेंबर :
राज्याच्या काही भागात आजपासून 1 ली ते 7 वीच्या वर्ग सुरू झाल्या असल्या तरी कल्याण डोंबिवलीत मात्र 15 डिसेंबरपर्यंत 1ली ते 7वीचे वर्ग बंदच राहणार आहेत. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोवीडची कमी होणारी रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून राज्यातील 1ली ते 7 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोवीडचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनमूळे काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतेलली व्यक्ती कोवीड पॉझिटिव्ह आल्यानंतर चिंतेत अजूनच भर पडली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाकडून आणखीनच खबरदारी घेण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत आज झालेल्या बैठकीत कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या नव्या व्हेरीयंटचा वाढता प्रसार पाहता कल्याण डोंबिवली क्षेत्रातील 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग 15 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात ओमीक्रॉनच्या प्रसाराबाबतची परिस्थिती लक्षात घेऊन 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा