Home ठळक बातम्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती सोहळ्यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी डोंबिवलीत

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती सोहळ्यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी डोंबिवलीत

 

डोंबिवली दि.1 डिसेंबर :
डोंबिवलीतील ख्यातनाम विचारवंत, नामवंत साहित्यिक, व्याख्याते, प्रवचनकार डॉ.सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीनिम्मित आयोजित सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गुरुवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळकनगर विद्यामंदिराच्या प्रांगणात हा सोहळा साजरा होणार आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सत्कार सोहोळ्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या ‘डावी विषवल्ली’ या ५० व्या पुस्तकाचे आणि डॉ. शेवडे गौरव ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी होणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे यांचा भाजपत प्रवेश
या पत्रकार परिषदेपूर्वी विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा उमेश पडावळे यांनी आपल्या पतीसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रतिभा पडावळे यांची जिजाऊ संघटना राज्य सरकारच्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असून त्यांच्या कारभाराला कंटाळून त्या भाजपात आल्याची माहिती आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली. तसेच येत्या काळात महाविकास आघाडीतील आणखी काही घटक पक्षही येत्या काळात भाजपात सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा