Home ठळक बातम्या केडीएमसी अग्निशमन दलाचे महानगर गॅसकडून कौतूक : डोंबिवलीतील आगीदरम्यान दाखवलेले प्रसंगावधान

केडीएमसी अग्निशमन दलाचे महानगर गॅसकडून कौतूक : डोंबिवलीतील आगीदरम्यान दाखवलेले प्रसंगावधान

 

कल्याण दि. 10 मार्च :
डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीच्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर असलेल्या सीएनजी पंपामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भिती होती. परंतू त्यावेळी केडीएमसी अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे ही मोठी दुर्घटना टळू शकली. त्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केडीएमसी अग्निशमन दलाची भेट घेत त्यांचे कौतुक केले.

दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाजता डोंबिवली एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग लागली होती. एका कंपनीपासून सुरुवात झालेल्या या आगीने मग शेजारील कंपनीलाही आपल्या विळख्यात घेतले. तर याहून भयानक म्हणजे आग लागल्याच्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर महानगर गॅसचा सीएनजी पंप आहे. त्यामूळे स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. परंतू केडीएमसी अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे इतक्या जवळ असूनही या सीएनजी पंपाला त्याची कोणतीही झळ बसली नाही.

एकीकडे या कंपन्यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतानाच केडीएमसी अग्निशमन दलाने सीएनजी पंपावर चार गाड्या तैनात करत गॅस टाक्यांवर अखंड पाण्याचा मारा सुरूच ठेवला. त्यामुळे आगीच्या इतक्या जवळ असूनही या गॅस टाक्यांना कोणतीही झळ बसू शकली नाही. आणि एक मोठी दुर्घटना टळली गेली.

दरम्यान केडीएमसी अग्निशमन दलाने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे महानगर गॅस कंपनीने कौतूक केले आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या ऑपरेशन – मेंटेनन्स विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट सितांशू रॉय चौधरी, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद रानडे, सिनिअर मॅनेजर रावसाहेब पाटील, डेप्युटी मॅनेजर महेश पांढरे आदींनी मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांची भेट घेत आभार मानले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा