Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (14 मार्च 2023) राहणार बंद

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (14 मार्च 2023) राहणार बंद

 

कल्याण डोंबिवली दि.10 मार्च :
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी 14 मार्च 2023 रोजी बंद राहणार आहे.

कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.

केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरकण केंद्र आणि मोहने उदंचन केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी उपकरणांचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

त्यामुळे येत्या मंगळवारी 14 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील लेखकेडीएमसी अग्निशमन दलाचे महानगर गॅसकडून कौतूक : डोंबिवलीतील आगीदरम्यान दाखवलेले प्रसंगावधान
पुढील लेखमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशक्य कामेही शक्य – आमदार निरंजन डावखरे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा