Home ठळक बातम्या शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत – खासदार डॉ...

शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत – खासदार डॉ श्रीकांत शिंदे

श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात मोफत डाळ आणि साखर वाटप

कल्याण दि.14 जानेवारी :
बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचे विचार घराघरांमध्ये पेरले ते त्यांच्या नंतरच्या पिढीने पुढे घेऊन जायला पाहिजे होते. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कोण करत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याची स्पष्टोक्ती डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली. (Shiv Sena chief’s Hindutva Eknath Shinde is taking forward – MP Dr Srikant Shinde)

प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील नागरिकांना डाळ आणि साखरेचे मोफत वितरण खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार डॉ. शिंदे बोलत होते.

बाळासाहेबांची दोन्ही स्वप्नं मोदींनी पूर्ण केली…
राममंदिर बांधण्याचे आणि काश्मीरमधील 370 कलम हटवण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही दोन्ही स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. तर राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नाही असे सांगणाऱ्यांसोबत ते आज मांडीला मांडी लावून बसले आहेत अशा शब्दांत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राममंदिराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला त्यांची मांडी…
बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचे विचार घराघरांमध्ये पेरले ते त्यांच्या नंतरच्या पिढीने पुढे घेऊन जायला पाहिजे होते, पण जे आज राममंदिराला विरोध करत आहेत, राममंदिर समारोहाचे ज्या पक्षाला आमंत्रण येऊनही त्याला हजर राहणार नाही असे सांगणाऱ्या राजकीय पक्षासोबत हे लोकं मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कोण करत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमच्याविरोधात कोणीही लढा, आम्ही घाबरत नाही …
आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातुन उभे केले. त्यावेळेला दोन आमदारांची तिकीट कापली आणि आज हे आम्हालाच दोष देत आहेत. आम्ही घराणेशाही सारखे काम करत नाही आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत. विविध नेते वेगवेगळी पदे भूषवित आहेत. ज्यावेळी कल्याण लोकसभेत लढायला कोणी नव्हते, त्यावेळी आम्ही उभे राहिलो अशी आठवण खासदार श्रीकांत शिंदे यांनी घराणेशाहीच्या आरोपांवर करुन दिली. तर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आलटून-पालटून आमच्याविरोधात कोणीही लढा, आम्ही घाबरत नाही असे वक्तव्यही श्रीकांत शिंदे यांनी केले.

श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त घरांमध्ये करा गोडधोड…
तब्बल 500 वर्षानंतर आपल्या सर्वांचे प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या 22 जानेवारी रोजी प्रत्यक्षात उतरत आहे. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर प्रत्यक्षात उतरवणार आहे. त्यामुळे हा सोहळा अगदी दिवाळी आणि दसऱ्या प्रमाणे साजरा करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. तसेच या सोहळ्यानिमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड झाले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हे डाळ आणि साखरेचे मोफत वाटप करण्यात येत असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

कल्याण मतदारसंघात डोंबिवली पूर्वेत माजी महापौर विनिता राणे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या प्रभागात, कै. नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या देवीचा पाडा, गोपीनाथ चौकात तर कल्याण पूर्वेमध्ये मल्लेश शेट्टी, महेश गायकवाड, निलेश शिंदे , संगिता गायकवाड, सुशीला माळी यांच्या प्रभागात हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, प्रशांत काळे, छायाताई वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा