Home ठळक बातम्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाकडून उद्या डोंबिवलीत ‘हिंदू गर्वगर्जना’ मेळाव्याचे आयोजन

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाकडून उद्या डोंबिवलीत ‘हिंदू गर्वगर्जना’ मेळाव्याचे आयोजन

मंत्री दादा भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मार्गदर्शन

डोंबिवली दि.22 सप्टेंबर :
शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाकडून उद्या डोंबिवलीत हिंदू गर्वगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पाटीदार हॉलमध्ये होणाऱ्या या मेळाव्यामध्ये राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार असून एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

राज्यामध्ये झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचा डोंबिवलीत हा पहिलाच मेळावा होत आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी तो यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. उद्याच्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी डोंबिवलीमध्ये प्रमुख पदाधिाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली.

या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि त्यांच्या शिकवणीचा वारसा पोहोचवला जाणार असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली. तर या मेळाव्यासोबतच कल्याण लोकसभेतील संपर्क यात्रेची सुरुवातही केली जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा